Shiv Sena is aggressive due to excavation of roads in Dhule

मागील दोन वर्षांपासून धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नवरंग पाणी टाकी समोरून जाणारा दत्त मंदिर पर्यंतचा प्रमुख रस्ता आग्रारोड भूमिगत गटार योजनेच्या नावाने खोदून ठेवला आहे. हा रस्ता धुळे शहरातील महत्त्वाचा रस्त्यांपैकी एक मानला जातो, बांधकाम विभागांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाकरिता वारंवार बांधकाम विभागाला सांगून देखील काम पूर्ण केले नाही म्हणून आज धुळे शिवसेनेच्यावतीने बांधकाम विभागात अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना बेशर्मी चे झाड देवून त्यांचा निषेध करण्यात आला(Shiv Sena is aggressive due to excavation of roads in Dhule).

    धुळे : मागील दोन वर्षांपासून धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नवरंग पाणी टाकी समोरून जाणारा दत्त मंदिर पर्यंतचा प्रमुख रस्ता आग्रारोड भूमिगत गटार योजनेच्या नावाने खोदून ठेवला आहे. हा रस्ता धुळे शहरातील महत्त्वाचा रस्त्यांपैकी एक मानला जातो, बांधकाम विभागांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाकरिता वारंवार बांधकाम विभागाला सांगून देखील काम पूर्ण केले नाही म्हणून आज धुळे शिवसेनेच्यावतीने बांधकाम विभागात अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना बेशर्मी चे झाड देवून त्यांचा निषेध करण्यात आला(Shiv Sena is aggressive due to excavation of roads in Dhule).

    शिवसेनेच्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभाग अधिकारी यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. भूमिगत गटार योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहे, ही योजना शंभर टक्के अयशस्वी ठरेल यात शंका नाही. येणाऱ्या काळात शासनस्तरावरून या प्रकरणी चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी विरोधात चौकशी करून कारवाई होईलच यात शंका नाही.

    गेल्या दोन वर्षापासून देवपूर भागातील नवरंग पाणी टाकी समोरून जाणारा दत्त मंदिर पर्यंतचा महत्त्वाचा रस्ता भूमिगत गटारी च्या नावाने खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे या रस्त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात देखील झाले आहे. त्यामुळे सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना महानगर च्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अल्टिमेटम देत सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारांना धडा शिकवला जाईल असा गंभीर इशारा शिवसेनेने दिला.