आदित्य ठाकरे, संजय राऊत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मैदानात

आदित्य ठाकरे हे कलिना- कुर्ला भागात मेळावा (Meeting) घेत आहेत. तर संजय राऊत यांचा दहीसर भागात मेळावा होणार आहे. या शिवाय मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनही केले जाणार असून सामनाचे कार्यालय ते शिवसेना भवन अशी बाईक रॅली (Bike Rally) काढण्यात येणार आहे.

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना (Shivsena) अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. मुंबईत आज शिवसेने नेते तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मेळावा आहे. या मेळाव्यातून संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

    आदित्य ठाकरे हे कलिना- कुर्ला भागात मेळावा (Meeting) घेत आहेत. तर संजय राऊत यांचा दहीसर भागात मेळावा होणार आहे. या शिवाय मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनही केले जाणार असून सामनाचे कार्यालय ते शिवसेना भवन अशी बाईक रॅली (Bike Rally) काढण्यात येणार आहे.

    शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा हाती घेऊ, असा संभ्रम पसरला आहे. त्यामुळे शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातला संभ्रम दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आजच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांचा मुंबईत जाहीर मेळावा होत आहे. मरिन लाइन्स येथील मातोश्री सभागृहात मेळावा होत असून ‘साहेब आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव’ अशी मेळाव्याची टॅगलाईन आहे.