…म्हणून शिवसेना नेते नितीन बानगुडे यांनी थोपटली शहराध्यक्ष मोरेंची पाठ

छत्रपती शाहू स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपूरमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सातारा, सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला.

    सातारा : छत्रपती शाहू स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपूरमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सातारा, सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला. यावेळी दत्तात्रय नलावडे रमेश बोराटे उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ व गणेश अहिवळे उपस्थित होते.

    बानगुडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रहिमतपूर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी सदिच्छा भेट घेत बानगुडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, शिवसेनेचे शहराध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची दखल बानगुडे-पाटील यांनी घेतली. मोरे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी 11 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामाची निविदा लवकरच सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून काढली जाणार आहे. या कामाची दखल बानगुडे पाटील यांनी घेत मोरे यांना शाबासकी दिली व त्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार केला.