शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला; उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

भायखळा येथील शिवसेना शाखा क्रमांक २०८ येथील विभागप्रमुख विजय कामतेकर आणि विधानसभा संघटक बबन गावकर यांच्यावर काल रात्री पावणेबाराच्या सुमारास तीन अज्ञातांनी हल्ला केला. याची दखल घेऊन आज उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांची भेट घेतली.

    मुंबई : भायखळा (Byculla) येथील शिवसेना (Shivsena) शाखा क्रमांक २०८ येथील विभागप्रमुख विजय कामतेकर आणि विधानसभा संघटक बबन गावकर यांच्यावर काल रात्री पावणेबाराच्या सुमारास तीन अज्ञातांनी हल्ला (Attack) केला. याची दखल घेऊन आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, नगरसेवक रमाकांत रहाटे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

    उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांनी राजकारणात पडू नये. तसेच, शिवसैनिकांच्या (Shivsainik) केसाला धक्का लागला तर शांत बसणार नाही. तसेच, हे राजकरण नाही, सूडबुद्धीने केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घ्यावे. पोलीस हे जनतेचे रक्षक असतात; मात्र, हेच भक्षक झाले तर कसे होणार, असा सवाल ठाकरे यांनी केला.