संजय राऊतांची जहरी टीका; ‘नार्वेकरांची राजकीय पत्रकार परिषद हास्यास्पद…’

ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी लगेचच पत्रकार परिषद घेतली. आता यावर खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समाचार घेतला आहे.

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता निकालाचा (ShivSena MLA disqualification) विषय अधिक चिघळला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गट (Thackeray group) आक्रमक झाला आहे. याबाबत पुरावे सादर करण्यासाठी ठाकरे गटाने महापत्रकार परिषद (Maharpatrakar Parishad) घेत धक्कादायक खुलासे केले. राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी लगेचच पत्रकार परिषद घेतली. आता यावर खासदार संजय राऊत  (MP Sanjay Raut) यांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा देखील समाचार घेतला आहे.

    संजय राऊत यांनी महापत्रकार परिषदेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. तसेच लवाद ट्रॅव्हूनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणल्याचे सांगितले. पुढे त्यांनी नार्वेकरांची पत्रकार परिषद राजकीय असल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, “नार्वेकरांनी राजकीय पत्रकार परिषद घेतली हे हास्यास्पद आहे. त्यात ते भलताच तुंतुना वाजवत होते. नार्वेकर आपण आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत. साध्या वकिलाला देखील कळते ते तुम्हाला देखील कळायला पाहिजे. तुमचे आणि देवेंद्र फडणवीस यांची डिग्री तपासायला लावू का?”  असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

    पुढे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. राऊत म्हणाले, “खरी शिवसेना इकडे आहे, 23 जागा लढत आहे याआधी सुद्धा लढत आहे आणि त्याच्यानंतर ही लढू ही खरी शिवसेना आहे. आताची शिवसेना ही पाकीट मारी आहे. दुसऱ्याचे पाकीट मारायचे आणि आपल्या खिशात ठेवायचा तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदे गटाच्या जागा आहेत त्या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायचे. मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढायचा हे तुम्ही लिहून घ्या,” अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.