“रडायच नाही…लढायचं”, ईडी कोठडीतून संजय राऊतांचे पत्र

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीच्या कोठडीतून त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना पत्र लिहून संकट काळात पाठिशी राहणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहलं आहे.

    मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitre house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर राऊतांची गुरुवारी ईडी कोठडी संपली होती, व यावर सुनावणी पार पडल्यानंतर पुन्हा त्यांना ८ ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे. (sanjay raut ED has been remanded in custody till August 8) त्यामुळं राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. पण ईडी कोठडीतून त्यांनी संघर्षबाणा दाखवला असून, तिथून त्यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांना पत्र लिहलं आहे. (Sanjay raut letter to opposition party leaders)

    दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीच्या कोठडीतून त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना पत्र लिहून संकट काळात पाठिशी राहणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहलं आहे. केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावर राजकीय हेतून, सूडभावनेतून करण्यात आलेल्या कारवाईवेळ तुम्ही मला पाठिंबा दिलात त्याबद्दल आपला आभारी आहे. विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी सध्या कठिण दिवस आहेत. मी सुरु केलेला सत्यासाठीचा लढा कितीही दबाव टाकला तरी थांबवणार नाही. मी माघार घेणार नाही लढत राहणार आहे. वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रडायचं नाही लढायचं हा मंत्र दिलेला आहे, तसे मी लढणार असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

    काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

    मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. पत्राचाळीच्या जमीन व्यवहारात संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. याच प्रकरणी संजय राऊतांची १ जुलैला चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणा-या नागरिकांची फसवणूकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.