navi mumbai shivsena protest

ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन (Shivsena Protest In Navi Mumbai) केले. राज्यातील सरकारच्या उदासीनतेमुळे १.४५ लाख कोटी रूपयांचा वेदांता प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला.

    नवी मुंबई : सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करून शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणाबाजी करून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन (Shivsena Protest In Navi Mumbai) केले. राज्यातील सरकारच्या उदासीनतेमुळे १.४५ लाख कोटी रूपयांचा वेदांता प्रकल्प गुजरातला गेला आहे. सरकारने महाराष्ट्राचे नुकसान केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

    राज्य सरकार गुजरात हितासाठी काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरकारच्या धोरणांविरोधात यापुढेही तीव्र लढा देण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

    या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, अतुल कुळकर्णी, शहर प्रमुख विजय माने, सोमनाथ वास्कर, प्रकाश पाटील, समीर बागवान,महेश कोठीवाले, बाबाजी इंदोरे, निखिल मांडवे, सिद्धाराम शिलवंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.