शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित; पोस्टर सोशल मीडियावर झळकले

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप मुंबई महापालिकेने मान्यता दिलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘आतुरता उध्दवसाहेबांच्या गर्जनेची’ असे ते पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

    मुंबई : जून महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीची (MVA) साथ सोडली. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपच्या (BJP) मदतीने सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यातच दसरा मेळावा (Dasara Melava) कोण घेणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष्य लागले आहे.

    शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप मुंबई महापालिकेने मान्यता दिलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘आतुरता उध्दवसाहेबांच्या गर्जनेची’ असे ते पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

    महाविकास आघाडीचे जाऊन स्थापन झालेले नवे सरकार मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणावर टीका करते? शिंदे गट कोणाला लक्ष्य करते? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष्य लागले आहे. त्यातच शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. त्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.