पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी

अनपेक्षितपणे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या पराभवा‌विषयी राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) निवडणुकीतील पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी फोडले आहे.

    नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकी(Rajyasabha Election)त शिवसेने(Shivsena)चा पराभव (Defeat) झाला. शिवसेनेच्या संजय पवारांविरोधात भाजप(BJP)ने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उभे करत निवडणुकीत चुरस वाढवली. त्यामुळे सध्या या पराभवासंदर्भात शिवसेना आत्मचिंतन करीत आहे. तर, महाविकास आघाडी(MVA)तील नेते संजय पवार यांच्या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडत आहेत.

    अनपेक्षितपणे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या पराभवा‌विषयी राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) निवडणुकीतील पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी फोडले आहे.

    शिवसेना अपक्ष आमदारांच्या संपर्कात होती. तसेच, निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे पाझर तलावांची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.

    संजय शिंदे आणि देवेंद्र भोयर यांची पाठराखण
    महाविकास आघाडीसोबत असलेल्या पाच ते सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु, त्यांची आताच नावे घेणे योग्य होणार नाही, असे सांगत आमदार संजय शिंदे आणि देवेंद्र भोयर यांची त्यांनी पाठराखण केली. आम्ही सर्व जण पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले पण दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते महाविकास आघाडी सोबत असून सरकारला कोणताही धोका नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.