कल्याण लोकसभेचा खासदार मीच राहणार मीच निवडणूक लढवणार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला विरोधकांना टोला

दिवा येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असं लिहिलेला केक कापला होता.

  कल्याण ग्रामीण : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसे आमदार राजू पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी असं सांगितले होते की कल्याण लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवली जाणार मात्र दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आहेत. डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, माझ्या लोकसभा मतदार संघाची काळजी करू नका, मी कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आणि पुन्हा मताधिक्याने निवडून येणार असे आव्हान विरोधकाना केलं

  जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील योग्य वेळी योग्य प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल
  ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असल्याचे चर्चा होती. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे लोकसभा कल्याण लोकसभा असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येतोय. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवसेना भाजपच्या युती आहे. युतीवर विश्वास ठेवणारा या ठिकाणचा मतदार आहे. शिवसेनेला किती जागा मिळणार भाजपला किती जागा मिळणार याबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील योग्य वेळी योग्य प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल असे सांगितल.

  कल्याण लोकसभेचा खासदार मीच राहणार मीच निवडणूक लढवणार
  कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जातायत. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आहेत. आज डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी माझ्या लोकसभा मतदार संघाची काळजी करू नका, मी कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आणि पुन्हा मताधिक्याने निवडून येणार असे आव्हान विरोधकांना केलं. काही लोकांना स्वप्न पडायला लागली आहेत, मुंगेरी लाल के हसीन सपने..स्वप्न पाहणं वाईट नाही मात्र आजीच्या पुढे माजी लागता कामा नये.

  दिवा येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असं लिहिलेला केक कापला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात राजू पाटील हे मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी बोलताना इथे काही लोकांना टीका करण्याची सवय आहे, पाच वर्षे लोकांना जबाबदारी दिली, त्यात काही केलं नाही आणि आता स्वप्न पडायला लागलीत, मुंगेरी लाल के हसीन सपणे, स्वप्न पाहणं वाईट नाही मात्र आजीच्या पुढे माजी लागता कामा नये अशी उपहासात्मक टीका केली. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी दुसऱ्यांनी केलेली पाहणी पाहायची, टीका करायची, आधी स्वतः कामे करा मी कुणाचं नाव लावून घेतलं नाही, कुणाला लावून घ्यायचं असेल तर लावून घेऊ शकता पाच वर्षात स्वतःचे ऑफिस सुरू केलं नाही जायच्या कुठे लोकांसमोर प्रश्न पडतोय अशी सडकून टीका नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली आहे.

  कल्याण ग्रामीणच्या पाटीदार भवनात खोणी म्हाडा रहिवासी संघटना आणि शिरडोण म्हाडा रहिवासी महासंघतर्फे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार समारंभामध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील उपस्थित होते, नागरिक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.