bhagatsingh koshyari photo

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केली. त्यानंर महाविकास आघाडीतील पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र अद्याप भगतसिंह कोश्यारींवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच ठाकरे गटाकडून राज्यपालांना चपला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    अमरावती: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विरोधक टीका करत आहेत. मात्र अमरावतीत (Amravati) राज्यपालांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न आज करण्यात आला.

    महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांना चप्पल दाखवण्याच्या प्रयत्न काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरम्यान आज अमरावतीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांसंदर्भात तसेच येथील गुन्हेगारीविषयक कारवायांवर अंकुश ठेवण्याविषयी चर्चा होणार आहे.

    ठाकरे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरच ठाकरे गटाचे कार्यकर्ते गोळा झाले. राज्यपालांचा ताफा जिथून जाणार होता, त्या रस्त्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चपला दाखवून निषेध व्यक्त करणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केली. त्यानंर महाविकास आघाडीतील पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्यपालांकडून वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान केला जातो. अशा राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीकडून लावून धरण्यात आली आहे. या मात्र अद्याप भगतसिंह कोश्यारींवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच ठाकरे गटाकडून राज्यपालांना चपला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.