uddhav thackeray

उद्धव ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत आपण सोबत असल्याची हमी दिली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मी लवकरच नाशिकला येणार आहे. तिथे गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ असा निर्धार केला.

    मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला. हायकोर्टात एकीकडे दसरा मेळावा प्रकरणी सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

    उद्धव ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत आपण सोबत असल्याची हमी दिली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मी लवकरच नाशिकला येणार आहे. तिथे गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ असा निर्धार केला.

    पुढे ते म्हणाले “उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयरीला लागा”.