स्वबळावर शिवसेना कधी लाचार होणार नाही आणि कुणाच्या पालख्या वाहणार नाही  – शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

स्वबळाच्या आधारे शिवसेना कधी लाचार होणार नाही आणि कुणाच्या पालख्या देखील वाहणार नाही असे सांगत या पुढील वाटचालही खंबीरपणाने करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी व्यक्त केला.

    मुंबई:  शिवसेनेचा(Shivsena) गेल्या पंचावन्न वर्षांचा इतिहास सर्वांसमोर आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्मलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या रक्षणाचाही नारा दिला होता यालाच स्वबळ म्हणायला हवे. या स्वबळाच्या आधारे शिवसेना कधी लाचार होणार नाही आणि कुणाच्या पालख्या देखील वाहणार नाही असे सांगत या पुढील वाटचालही खंबीरपणाने करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी आज व्हर्चुवल वर्धापन दिनाच्या(Shivsena Foundation Day) कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

    न्याय आणि हक्काच्या संघर्षासाठी शिवसेना

    ते म्हणाले की आज दसरा मेळाव्यात जसे मुख्यमंत्रीपद बाजुला ठेवून तुमच्या समोर शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून बोलण्यासाठी आलो होतो तसाच आलो आहे. मात्र नेमके काय बोलावे ते ठरवून आलो नाही. ते म्हणाले की, गेल्या पंचावन्न वर्षात न्याय आणि हक्काच्या संघर्षासाठी शिवसेना शिवसैनिकांच्या शक्तीने लढत पुढे आली आहे. मात्र गेल्या दिड वर्षात स्वाभिमानाने पक्ष पुढे जात असल्याने काही लोकांना पोटदुखी झाली आहे, त्याचे राजकीय औषध देवूच मात्र शिवसेनेला स्वबळाच्या चर्चा करत आव्हान दिले जात आहे. तर हे स्वबळ म्हणजे काय? ते मराठीबाणा आणि हिंदुत्वासाठी लढताना आपण दाखवून दिले आहे असे ते म्हणाले.

    हिंदुत्व हा आमचा श्वास आहे

    ते म्हणाले की नुकत्याच झालेल्या बंगालच्या निवडणुकांत बंगाली माणसाने जे स्व त्वाची शक्ती दाखवली तशी शक्ती आपण उभी केली आहे. त्यासाठी आपली प्रादेशिक अस्मिता जपलीच पाहीजे. ते म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा जे प्रचार करतात त्यांनी गैरसमज करून घेवू नये कारण हिंदुत्व हा आमचा श्वास आहे ते शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. मात्र कोरोनाच्या संकटातही ज्यांनी विकर्‍त आणि विद्रुप राजकारण केले त्यांना शिवसेनेचे हिंदुत्व समजले नाही. असे उद्धव ठाकरे  म्हणाले.

    संकटात धावून जाण्याचा धर्म हे आमचे हिंदुत्व

    उद्धव ठाकरे म्हणाले की, हाणामाऱ्या करणे रक्तपात करणे हेच शिवसैनिकांचे लक्षण नाही, सध्या काडकन आवाज काढण्याबाबत जी क्लिप व्हायरल झाली ती अन्याया विरोधात आवाज उठवण्याबाबत आहे. मात्र रक्तदान करत मानवतेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक संकटात धावून येणाऱ्या शिवसैनिकाचा धर्म हे आमचे हिंदुत्व आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की आमच्यावर वाटेल तसे आरोप करणा-यांना तू स्वत: कोण आहेस, तुझे चारित्र्य काय आहे हे आम्ही विचारणार नाही, कारण इतकी वर्ष शिवसेना राजकारणात राहिली आणि पुढे जात आहे ते लोकांच्या सहकार्यामुळेच घडले आहे हे स्पष्ट दिसते आहे.

    आर्थिक संकटातूनही बाहेर पडण्याचे आव्हान

    मुख्यमंत्री म्हणाले की, खरेतर पक्षाचा वर्धापन दिन असा साजरा करण्यात मौज नाही, पण ही जबाबदारी म्हणून आपण सारे पक्षाच्या कार्यक्रमातही कोरोनामुक्तीचा संकल्प करत आहोत. कोरोना नंतरच्या काळात सत्तेचे आणि निवडणुकांचे राजकारण करण्यासाठी स्वबळाचा नारा आपण देत असू तर लोक आपल्याला क्षमा करणार नाहीत असे सांगत ते म्हणाले की देश आराजकाकडे जात असताना आर्थिक संकटातूनही त्याला बाहेर काढण्याचे आव्हान आता समोर आहे. त्यात विकृत राजकारण बाजुला ठेवले पाहीजे.

    कोरोनामुक्ती ही चळवळ

    कोरोनामुक्ती ही चळवळ झाली पाहीजे तरच आपण या संकटातून बाहेर पडू असेही ते म्हणाले. मात्र सत्तेसाटी लाचार होत कुणाच्या पालख्या शिवसेना वाहणार नाही खंबीरपणे स्वाभिमानाने पुढच्या मार्गाने जाईला  जा आत्मविश्वास आज महत्वाचा आहे असे ते शेवटी म्हणाले.