पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; कंटेनर चालकाचा मृत्यू

पुण्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. बस आणि कंटेनरचा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रात्री उशिरा हा अपघात झाला.

    पुणे : पुण्यात (Pune) एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेनरचा भीषण अपघात (Container) झाला. या अपघातात कंटेनरच्या चालकाचा मृत्यू झाला असून दोन ते तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    बस आणि कंटेनरचा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरुळी देवाची (Uruli Dewachi) गावालगत रात्री उशिरा हा अपघात झाला. जवळच असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून (Saswad) पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात शिवशाही बसचा चालक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.