
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समुपदेशक आहेत. वेळोवेळी त्या शाळेत जाऊन मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करत असतात. दरम्यान या शालेत ही पिडीत मुलगी शिकते.
पुणे : इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीवर भाऊ, वडील, आजोबा व मामानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार वर्षांपासून नराधम या मुलीचा लैंगिक छळ करत होते. पुण्याला व नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी समुपदेशक महिला शिक्षक यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समुपदेशक आहेत. वेळोवेळी त्या शाळेत जाऊन मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करत असतात. दरम्यान या शालेत ही पिडीत मुलगी शिकते. समुपदेशन कार्यक्रमात या मुलीने हा प्रकार सांगितला आहे. मूळ कुटुंब बिहारचे आहे. बिहार, पुणे आणि मुंबई अश्या ठिकाणी घटना घडल्या आहेत. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.