
कारच्या चाकाखाली येऊन १४ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना अंबड लिंक रोड येथे घडली. या प्ररकरणी कार चालकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको : कारच्या चाकाखाली येऊन १४ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना अंबड लिंक रोड येथे घडली. या प्ररकरणी कार चालकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अहमद खान (विराट नगर) हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी १५ दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश येथून नाशिक अंबडलिंक रोड येथे आले होते. येथे त्यांनी एका ठिकाणी कामाला जायला देखील सुरवात केली होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान कंपनीतून घरी परतल्यानंतर त्यांची १४ महिन्यांची मुलगी आयेजा हिने वडिलांना पाहिले. तिने भेटण्यासाठी थेट घराच्या बाहेर धाव घेतली. यावेळी रस्त्याने जात असलेल्या ( एम एच १५ एच क्यू ५६८६) कारच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कारचा चालक हसनेन मुज्जमिल खान याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत