धक्कादायक! १२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

    औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील रस्त्यावर आज बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत धावत्या स्मार्ट सिटी बसला अचानक आग लागली. बसला आग लागल्याचे कळताच वाहन चालकाने गाडी थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग वीजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

    औरंगाबाद स्मार्ट सिटीची ही बस करमाडवरून औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात येत होती. तर बसमध्ये दहा ते बारा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

    औरंगाबादच्या बर्निंग बसच्या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की घटनेत संपूर्ण बसने पेट घेतला आहे. धूराचे लोट लांबपर्यंत जात असल्याचं पाहायला मिळतं. आग इतकी भयंकर होती की यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.