jodhpur accident

नवले ब्रिजच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या २२ चाकी लोडेड ट्रकचा भरधाव वेगात असतानाच ब्रेक फेल झाला. त्यामुळे उतारावर आल्यानंतर हा ट्रक कंट्रोल न झाल्याने ट्रक चालकाने समोरील वाहनांना उडविण्यास सुरूवात केली. रविवार असल्याने या भागात मोठी गर्दी असते. नागरिक बाहेरून शहरातयेण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्याचा मार्ग असल्याने या भागात मोठी वर्दळ असते.

    पुणे, पुण्यातील अपघात ब्रिज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नवले ब्रिजवर अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला असून, या अपघातात तब्बल ३० ते ३५ वाहनांना उडविल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ब्रेकफेल झालेल्या एका भरधाव ट्रकने नेहमीच्याच ठिकाणी उतरावार आल्यानंतर समोरील वाहनांना ठोकत त्यांचा अक्षर: चुराडा केला आहे. याघटनेत अनेकजन जखमी झाल्याची माहिती आहे.

    याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस व वाहतूक पोलीस तसेच पीएमआरडीएच्या अग्निशमन दल दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू केल्यानंतर जवळपास ३० ते ३५ वाहनांना उडविल्याची माहिती देण्यात आली आहे. गाड्यांच्या आकडेवारी पाहता या अपघातात १५ हून अधिक लोक जखमी झाल्याची शक्यता आहे. त्यात जवळपास १० ते १२ लोक गंभीररित्या जखमी झाले असून, या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

    नवले ब्रिजच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या २२ चाकी लोडेड ट्रकचा भरधाव वेगात असतानाच ब्रेक फेल झाला. त्यामुळे उतारावर आल्यानंतर हा ट्रक कंट्रोल न झाल्याने ट्रक चालकाने समोरील वाहनांना उडविण्यास सुरूवात केली. रविवार असल्याने या भागात मोठी गर्दी असते. नागरिक बाहेरून शहरातयेण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्याचा मार्ग असल्याने या भागात मोठी वर्दळ असते. यामुळे वाहनांची संख्या नेमकी यावेळेत मोठ्या प्रमाणात होती. त्यातच हा ब्रेक फेल ट्रक भरधाव वेगात आल्याने त्याने कार आणि इतर वाहनांना उडविले. त्यात काही वाहनांचा अक्षर: चुराडा झाला असून, हे वाहने पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे उभा राहत आहेत.

    घटनास्थळी सिंहगड रोड पोलीस व वाहतूक पोलिसांनी धाव घेत अपघात ग्रस्त वाहने काढण्याचे काम सुरू केले आहे. तर, अपघातानंतर या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी एक लेन बंद करत मदतकार्य सुरू केले आहे. पोलिसांकडून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या पुलावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या अपगातात नेमकी किती वाहने उडविली गेली व यात गंभीर जखमी किती लोक आहेत, याची माहिती घेतली जात आहे.