Shocking! हा दुजाभाव कशासाठी? मुंबादेवीच्या भाविकांचा रश्मी ठाकरे यांच्यामुळे दर्शनासाठी एक तास खोळंबा; पोलिसांकडून दर्शन पास धारकांना धक्काबुक्की!

रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासह आलेल्या ३ महिलांना आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ तसेच त्यांचे चिरंजीव प्रथमेश सकपाळ यांच्यासह काही शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हीआयपी गेटमधून आज सोडले. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स आडवे करून व्हीआयपी गेट प्रवेश बंद केला.

  मुंबई: मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात (Mumbadevi Temple, Mumbai) दर्शनाला आलेल्या भाविकांना आज शुक्रवारी सायंकाळी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. सायंकाळी ६:३० च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Wife Rashmi Thackeray) यांचे झवेरी बाजारच्या (Zaveri Bazar) दिशेला असलेल्या वी.आय.पी गेटवर आगमन झाले. रश्मी ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच पास धारकांना पोलिसांनी व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत जाण्यास मज्जाव केला होता(Pass holders were barred by the police from entering through the VIP entrance).

  रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासह आलेल्या ३ महिलांना आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ तसेच त्यांचे चिरंजीव प्रथमेश सकपाळ यांच्यासह काही शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हीआयपी गेटमधून आज सोडले. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स आडवे करून व्हीआयपी गेट प्रवेश बंद केला.

  रश्मी ठाकरे यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांकडून कुणालाही आत सोडण्यात आले नाही अनेक भाविकांनी पोलिसांना विचारणा केल्यावर पोलिसांचे असे म्हणणे असे होते की, “एकदा व्हीआयपी आत गेल्यानंतर तो दर्शन करून बाहेर येईपर्यंत पास धारक असले तरी देखील आम्ही कोणालाही आत प्रवेश देणार नाही ; व्हीआयपी पाहुणे बाहेर आल्यावर आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ”! असे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्हीआयपी गेटच्या बाहेर असलेल्या भाविकांना सांगण्यात आले.

  ७:०५ वा. रश्मी ठाकरे देवीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडल्या. त्यानंतर खोळंबा झालेल्या आणि अर्धा तास वाट पाहात ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांनी पोलिसांना हात जोडून विनवण्या केल्या की, आता तरी आम्हाला मंदिरात प्रवेश देण्यात यावा. परंतु पोलिसांनी कोणालाच आत सोडले नाही किंबहुना पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी व्हीआयपी पासधारकांवर नाहक आरडा ओरड करून धक्काबुक्की केल्याने यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.

  ज्येष्ठ नागरिकांना देखील पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सर्व भाविक शांततेत उभे राहून पास दाखवून आत जाण्याच्या तयारीत असतानाही किंवा कुठलीही धक्काबुक्की भाविकांकडून किंवा मंदिरात आत जाण्याची घाई नसतानाही पोलिसांनी त्यांच्यावर आरडाओरड करून त्यांना धक्काबुक्की केली त्यामुळे मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले भाविक प्रचंड नाराज झाले होते.

  त्यानंतर साडेसातच्या दरम्यान पोलिसांनी व्हीआयपी पास तपासून सगळ्यांना आत सोडले खरे परंतु आत गेल्यानंतर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखा अनुभव या व्हीआयपी पास धारकांना आला. व्हीआयपी गेट ओलांडून आत गेल्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोलिसांनी सामान्य रांगेत व्हीआयपी रांग वळवली आणि व्हीआयपी गेटमधून पास दाखवून आलेल्या भाविकांना थेट मंदिरात प्रवेश न देता सामान्य रांगेमध्ये पास धारकांची रांग कनेक्ट केली , त्यामुळे भाविक अचंब्यात पडले. तिथे आज व्हीआयपी गेटमधून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेने देखील पोलिसांना विनवणी केली परंतु कदम या पोलीस शिपायाने त्यांना देखील आत सोडले नाही. व्हीआयपी गेट मधून पास दाखवून आलेल्या नागरिकांना पुन्हा सामान्य रांगेमध्ये जोडण्याचं लॉजिक भाविकांच्या काही लक्षात आले नाही.

  कोणी व्हीआयपी दर्शनाला आल्यानंतर सामान्य नागरिकांना त्याचा मनस्ताप होणार नाही याची काळजी मंदिर प्रशासन आणि पोलीस दोघांनी घ्यायची असते परंतु तसे न होता मुंबादेवी मंदिरात वेगळेच घडले. दर्शनासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना पण पास असूनही मंदिरात सोडण्यात आले नाही.

  सिव्हिल ड्रेस वर असलेले पोलीस कर्मचारी महाजन हे भाविकांवर मोठ्याने आरडाओरड करत होते. घटनास्थळी एल.टी.रोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई देखील हजर होत्या. परंतु त्यांनाही ही परिस्थिती हाताळता आली नाही.