धक्कादायक! ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाने स्वतःला संपवलं

    औरंगाबादच्या हिरापूर शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. माजी सैनिकाचे नाव संजय कौशलसिंग राठोर, वय ४० वर्षे,संजय हे गतवर्षी लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. ते मूळचे गुजरातचे असूनपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राठोर एका महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये हिरापूर शिवारात राहत होते.
    रविवारी दुपारी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. काही वेळानी महिला दारू घेऊन आली तीने दार वाजवली असता बराच वेळ काहीच प्रतिसाद न आल्याने महिलेने अखेर, चिकलठाणा पोलिसांना कळविले. पोलिसांच्या उपस्थितीत दार उघडण्यात आले, संजय राठोर हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. पोलिसांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. तेथून घाटीत हलविले मात्र तो पर्यंत त्यांनी प्रामण सोडले होते.
    पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार स्वतः च्या 9 एमएम पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी पिस्तूल व काडतूस जप्त केले आहे. संजय राठोड यांच्या सोबत राहणारी महिलाची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले. सेवानिवृत्त झाल्यापासून संजय राठोर हे त्या महिलेसाबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.