
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांडे (वय २१), धीरज दिनेश तिवारी व प्रवीण रामजी पटेल (वय २१, तिन्ही रा. सिंधी, मध्य प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नागपूर : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांडे (वय २१), धीरज दिनेश तिवारी व प्रवीण रामजी पटेल (वय २१, तिन्ही रा. सिंधी, मध्य प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आकाश पांडे याने जुगारात पैसे हरल्यानंतर घरीच १०० रुपयांच्या नोटा छापणे सुरू केले. २०० व ५०० रुपयांच्या नोटा छापल्या तर सहज पकडले जाऊ म्हणून १०० रुपयांच्या नोटा कलर झेरॉक्स मशीनवर छापल्या. असे ७० हजार रुपये छापल्यानंतर त्याने प्रवीण रामजी पाटीलसह एका अल्पवयीन मुलाला काही नोटा घेऊन नागपूरला पाठवले. कामठी, कळमेश्वर, गोंडखैरीत या नोटा सहज चलनात आल्या. मात्र, कळमेश्वरला एका पानठेलेवाल्याला संशय आला व भंडाफोड झाला. आरोपींजवळून ४८ हजार ५०० रुपयांचा नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
बनावट नोटा चलनात आल्यास ३० टक्के कमिशन
आकाश दीड लाख रुपये हरला. त्यामुळे त्याला पैशाची गरज होती. त्याची धीरजसोबत ओळख झाली. संगणकाद्वारे बनावट नोटा तयार करण्याची योजना त्याने धीरजला सांगितली. नोटा चलनात आल्यास ३० टक्के रक्कम धीरजला मिळायची. धीरजने प्रवीण व अल्पवयीन मुलाला गोंडखैरी येथे बनावट नोटा चलनात आणण्यास पाठवले होते.