धक्कादायक! सातारा शहरसह तालुक्यातील चार जण बेपत्ता

वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरसह तालुक्यातील चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ रोजी पवळेश्वर लिंब येथील शिरीष नितीन चव्हाण हा किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे कामास जातो, असे सांगून गेला आहे.

    सातारा : वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरसह तालुक्यातील चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ रोजी पवळेश्वर लिंब येथील शिरीष नितीन चव्हाण हा किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे कामास जातो, असे सांगून गेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत. दुसऱ्या घटनेत ज्ञानदेव शंकर सणस (रा. रेनावळे, पोस्ट वडूथ, ता. सातारा) हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास हवालदार गोरे करीत आहेत. तिसऱ्या घटनेत शाहूपुरी येथील एक पंचवीस वर्षीय युवती बहिणीकडे जाते, असे सांगून घरातून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गाढवे करीत आहेत. चौथ्या घटनेत मोहन विठ्ठल शिंदे (रा. बसप्पाचीवाडी, ता. सातारा) हे घरात कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.