धक्कादायक! एफटीआयआयमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन परिसरातील फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन या (एफटीआयआय) संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.अश्विन शुक्ला (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    पुणे : डेक्कन परिसरातील फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन या (एफटीआयआय) संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.अश्विन शुक्ला (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी डेक्कन पोलीसांनी धाव घेतली आहे.

    लॉ कॉलेज रस्त्यावर एफटीआयआय ही शिक्षण संस्था आहे. येथे अश्विन तिसऱ्या वर्गात शिकत होता. अश्विन हा मुळचा वेस्ट गोवाचा आहे. शिक्षणानिमित्त तो पुण्यात राहत होता. संस्थेच्या बॉईज हॉस्टेलमध्ये तो मित्रांसोबत राहत होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी तो दरवाजा उघडत नसल्याने ही माहिती पोलीसांना देण्यात आली. त्यानूसार, डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी तत्काळ त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, अश्विनने आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण समजू शकलेले नाही. पण, नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असण्याची दाट शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.