shocking horrible crime news bar businessmen public toilet converted into bar in apmc truck terminus turbhe navi mumbai nrvb

एपीएमसी ट्रक टर्मिनल (APMC Truck Terminus) जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते मात्र बार व्यवसायिकाने (Bar Businessman) या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक बातमी (Shocking News) समोर येत आहे. आता पर्यंत आपण बारमध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction in the bar), अनधिकृत जागेवर बार (Bar On An Unauthorized Place) अशा बातम्या पाहिल्या असतील मात्र नवी मुंबईतील तुर्भे विभागात
(Turbhe Area) चक्क सार्वजनिक शौचालयालयाचे बार मध्ये रूपांतर करण्यात आले आहे (Public Toilet Converted Into Bar).

एपीएमसी ट्रक टर्मिनल (APMC Truck Terminus) जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते मात्र बार व्यवसायिकाने (Bar Businessman) या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केली आहे. नवी मुंबईतील बार व्यवसायिकांना ना पोलिसांची भीती आहे ना प्रशासनाची त्यामुळेच ‘हम करे सो कायदा’ या प्रणालीचा वापर करुन हे बार व्यावसायिक वागताना पहायला मिळत आहेत.

काही मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जात हे प्रकरण बाहेर काढल्याने ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे. शहरात शौचालयाचे बार होत असतील तर पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणा काय करते हा प्रश्न नवी मुंबईकरांना सतावत आहे. प्रत्यक्षात हे सिडकोचे शौचालय (Cidco Toilet) असून अद्याप एपीएमसी प्रशासनाकडे हसतांतरित करण्यात आलेले नाही. यात मनपाच्याच एका अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने (MNS Demands) केली आहे.

पाहा व्हिडिओ :