cruelty like nirbhaya incident rape case with girl in fatehpur cigarette burns stomach and chest nrvb

    पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. आज एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात दोन सख्या भावांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना अटक केली आहे. किशोर परमेश्वर केदार (वय २३), नकुल परमेश्वर केदार (वय २१, दोघे रा. गोसावी वस्ती, हॅप्पी काॅलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शाळकरी मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    मुलीला जातीवाचक शिवीगाळदेखील केल्याचा दावा

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिकवणीला जायची. नकुल तिची छेड काढायचा. छेडछाडीमुळे घाबरलेल्या मुलीने नकुलचा मोठा भाऊ किशोर याच्याकडे तक्रार केली. किशोरने मुलीला धमकावून तिला एका घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. माझ्या भावाची तक्रार केल्यास तुला जीवे मारु, अशी धमकी दिली. मुलीला जातीवाचक शिवीगाळदेखील केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरानंतर मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन किशोर आणि नकुल यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.