मुंबईत अंधेरीमध्ये धक्कादायक घटना; गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू, तर चौघांची प्रकृती गंभीर

गावठी दारु पिऊन विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. ज्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

    मुंबई : मुंबईतील अंधेरी (Andheri) मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्व परिसरातील पंप हाऊस परिसरात गावठी दारु (Liquor) प्यायल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावठी दारु पिऊन विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. ज्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. गावठी दारु प्यायलेल्या या चारही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहेत (Shocking incident in Andheri in Mumbai; One dies after drinking village liquor, while)

    नेमकं काय घडलं?

    दरम्यान, अंधेरीतील पंप हाऊस परिसरात एका घरात पाच कामगार राहत होते. मंगळवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाची कामगारांना सुट्टी होती. ड्राय डे असूनही चारही कामगार गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामधून गावठी दारु पिऊन घरी आले आणि त्यानंतर झोपून गेले. मात्र काल दिवसभर त्यांनी दरवाजा उघडला नाही. यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना फोन केला.

    सर्व कामगार 18 ते 20 वयोगटातील

    मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा एमआयडीसी पोलिसांनी दरवाजा उघडला, तेव्हा एक कामगार मृत्यूमुखी पडल्याचं निदर्शनास आलं. तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं दिसलं. यानंतर त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हे सर्व कामगार 18 ते 20 वर्षे वयोगटातले आहेत.