डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, वाशरुमध्ये चोरट्याने शिरून मुलीचे हातपाय तोंड बांधून घरात केली चोरी

पैसे आणि दागिने गेले असले तरी मुलगी सुरक्षित राहिली ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. मात्र पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक केली पाहिजे अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

    डोंबिवली : वैद्यकीय व्यवसायात असलेले वडिल कामावर गेले. आई शेजाऱ्यांच्या घरी कामानिमित्त गेली होती. याच वेळी दोन चोरटे घरात शिरले. आठ वर्षीय मुलीला वॉश रुममधून उलचून तिचे हातपाय तोंड बांधून घरातील रोकड आणि दागिने घेऊन पसार झाले. ही घटना धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पैसे आणि दागिने गेले असले तरी मुलगी सुरक्षित राहिली ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. मात्र पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक केली पाहिजे अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

    डोंबिवली पूर्वेतील नांदीवली टेकडी परिसरात वैद्यकीय व्यवसायात असलेले वडील कामावर गेले. आई शेजारी काही कामानिमित्त गेली होती. याच वेळी अचानक एक व्यक्ती घरात घुसला. त्यावेळी घरात आठ वर्षाची मुलगी वॉशरूम मध्ये गेला. हा अज्ञात व्यक्ती वाशरुममध्ये घुसला. तिने त्या मुलीचे हात पाय आणि तोंड बाधून बाल्कनीत ठेवले. घरात झडती सुरु केली. घरातील हॉल, बेडरुम सगळीकडे शोध घेतला. या चोरटयाला घरातील देवाऱ्यात ठेवलेले आठ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड मिळाली.

    एक चोरटा दाराआड लपून बसला होता. चोरी करुन झाल्यावर त्या दोघांनी त्या मुलीला उचलून जिना उतरत होते. त्यावेळी मुलीने प्रतिकार केला. त्यांच्या तावडीतून ती निसटून घरात आली. आई आल्यानंतर तिने सर्व प्रकार कथित केला. या नंतर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. डोंबिवलीत दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.