कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना, कोयता हातात घेऊन तरुनांची दहशत, आरोपींचा शोध सुरू

पवन चाैरसिया हा टपरीचालक चिंचपाडा परिसरात राहतो. त्याची पानटपरी चिंचपाडा म्हात्रे नाका साकेत कॉलेजजवळ आहे. काल रात्रीच्या सुमारास त्याच्या टपरीवर काही जण आले. हातात कोयता घेऊन दुकान बंद कर असे धमकाविले.

    कल्याण : हातात कोयता घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरीवर सामानाची नासधूस करणे टपरी चालकासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा म्हात्रे नाका परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. हातात कोयता घेतलेल्या तरुणांची दहशत सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय आहे. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान कल्याण पूर्व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे वाढते गुन्हेगारी रोखण्याचा आव्हान पोलिसांसमोर उभा ठाकलं आहे.

    पवन चाैरसिया हा टपरीचालक चिंचपाडा परिसरात राहतो. त्याची पानटपरी चिंचपाडा म्हात्रे नाका साकेत कॉलेजजवळ आहे. काल रात्रीच्या सुमारास त्याच्या टपरीवर काही जण आले. हातात कोयता घेऊन दुकान बंद कर असे धमकाविले. त्याच्या अंगावर कोयता उगारुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी त्याच्या दुकानातील सामानाची नासधूस करत पैसे लुटले. त्याने प्रतिकार केला असता त्याच्यासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुड्डा, बाबू गायकवाड आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.