रिक्षा खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच आईच्या डोक्यात मारला दगड, पिंपरीतील धक्कादायक घटना; आरोपीवर गुन्हा दाखल

रिक्षा खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच आईच्या डोक्यात दगड घातला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पिंपरी येथील गांधीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पिंपरी : रिक्षा खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच आईच्या डोक्यात दगड घातला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पिंपरी येथील गांधीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अतुल सुगंधराव खंडागळे (वय ३०, रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या भावाला भेटण्यासाठी गांधीनगर येथील कमानी समोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपी येथे आला व त्याने फिर्यादी यांच्याकडे ऑटो रिक्षा खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला असता चिडून जाऊन त्याने शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच जवळ पडलेला दगड उचलून थेट फिर्यादीच्या डोक्यात मारत त्यांना गंभीर जखमी केले.