पुण्यात धक्कादायक प्रकार, नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला गंडा; काय आहे संपूर्ण प्रकरण? : वाचा सविस्तर

रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भान्डे विकणे तसेच त्याचे परिक्षण करण्याच्या व्यावसायात गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नासाचे (Nasa) नाव घेऊन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.

    पुणे : रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भान्डे विकणे तसेच त्याचे परिक्षण करण्याच्या व्यावसायात गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नासाचे (Nasa) नाव घेऊन नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून, त्यांना तांदुळ स्वत:कडे खेचून घेणारे धातूचे भांडे आहे. या भाड्यांचे परिक्षण अंतराळात संशोधन करणारी नासा कंपनी करणार असल्याची बतावणी केली. तर त्यांच्या प्रतिनिधींना भारतात आणून त्यांचे संशोधनाच्या अहवालासाठी मोठा खर्च येतो, या धातूच्या भांड्याच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास भांड्याच्या विक्रीतून मोठा फायदा मिळू शकतो, असे सांगण्यात आले होते.

    ‘या’ आरोपींवर गुन्हा दाखल

    याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना जून २०१८ ते २०२३ या कालावधीत घडली आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

    काय आहे प्रकरण? 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगनमत करुन आरोपींनी राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला. तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले़. त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते. पण, कोणताही परतावा भेटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक शाखेकडे तक्रार दिली होती. त्याची चौकशी करुन हा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास ५ ते ६ कोटींची १००हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.