अबुधाबी-मुंबई विमानात धक्कादायक प्रकार; मद्यधुंद महिलेने एअर होस्टेलला शिवीगाळ करत स्वत:चेच काढले कपडे, महिलेला अटक व सुटका

आता विमानात आणखी एक गंभीर तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. अबुधाबीहून मुंबईला (Abu Dhabi-Mumbai flight) जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या (यूके 256) फ्लाइटमध्ये (Vistara Airlines) एका 45 वर्षीय महिला प्रवाशाने केबिन क्रूच्या सदस्यावर हल्ला केला.

    मुंबई– मागील काही दिवसांपासून विमानात (Plane) चित्रविचित्र घटना आणि गैरप्रकार घडताहेत. महिन्यापूर्वी विमानात एका तळीरामाने महिलेनवर (Women) लघुशंका केल्याची घटना ताजी असताना, तसेच बंगळुरमध्ये विमानातच एअर होस्टलशी (Air Hostel) दारुड्यांनी हुल्लडबाजी घटना ताजी असताना, आता विमानात आणखी एक गंभीर तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. अबुधाबीहून मुंबईला (Abu Dhabi-Mumbai flight) जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या (यूके 256) फ्लाइटमध्ये (Vistara Airlines) एका 45 वर्षीय महिला प्रवाशाने केबिन क्रूच्या सदस्यावर हल्ला केला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार ही महिला मूळची इटलीची आहे.

    फ्लाइटमध्ये गोंधळ…

    दरम्यान, फ्लाइटमध्ये गोंधळ घालणे आणि क्रू मेंबरला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मात्र, महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यासोबतच महिलेला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, महिला विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये (यूके 256) अबू धाबीहून मुंबईला जात होती. मद्यधुंद अवस्थेत त्याने केबिन क्रू मेंबरला धक्काबुक्की केली आणि दुसऱ्या क्रू मेंबरवर थुंकले एअरलाइन कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करणाऱ्या सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रवासी इटलीची असून तिचे नाव पाओला पेरुचियो आहे. ती स्त्री खूप मद्यधुंद होती.

    स्वत:चेच काढले कपडे…

    मद्यधुंद महिला आपल्या सीटवरून उठली आणि बिझनेस क्लासच्या सीटवर बसू लागली तेव्हा क्रू मेंबर्सनी त्यावर आक्षेप घेतला आणि तिला सीटवरून उठण्यास सांगितले. यावर महिलेने संतप्त होऊन क्रू मेंबरच्या तोंडावर ठोसा मारला. त्याचवेळी अन्य क्रू मेंबरने महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलेनेही त्याच्यावर थुंकले. महिला एवढ्यावरच थांबली नाही, तिने आपले कपडे काढले आणि फ्लाइटमध्ये इकडे तिकडे फिरू लागली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबर्सशी गैरवर्तन करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.