Shocking! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : १४ वर्षांत साक्षीदारांची संख्या घटली, १९५ वरून साक्षीदारांची संख्या १२५ वर

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव बाजारपेठेत (Malegaon Market) बॉम्बस्फोट झाला ज्यात सहा जण ठार आणि सुमारे १०० जण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक कऱण्यात आली होती.

  • राष्ट्रीय तपास संस्थेनची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला (Malegaon Blast Case) १४ वर्ष लोटली असून या कालावधीत साक्षीदारांच्या संख्येत घट झाली (The number of witnesses decreased) असल्याची महिती शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. एनआयएकडे याआधी १९५ साक्षीदारांची यादी होती ती संख्या आता १२५ वर पोहोचली असून सर्व साक्षीदार तपासणे बाकी आहेत, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव बाजारपेठेत (Malegaon Market) बॉम्बस्फोट झाला ज्यात सहा जण ठार आणि सुमारे १०० जण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक कऱण्यात आली होती.

१४ वर्ष होऊनही अद्याप खटला सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने खटल्याचे कामकाज जलदगतीने करण्याचे आदेश दिलेले असतानाही खटल्याचे कामकाज संथगतीने सुरू असल्याचा आरोप करून खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्या. अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावर्षी जुलै महिन्यात एनआयएकडे २१८ साक्षीदारांची यादी होती आणि त्यातील २५६ साक्षीदार तपासले गेले होते. मागील अडीच महिन्यांत आणखी १४ साक्षीदार झाले आहेत. न्यायालयाच्या सूचनेनुसार, एनआयएकडून साक्षीदारांची यादी तपासण्यात आल्यानंतर घटनेच्या १४ वर्षांनंतर साक्षीदार एकतर मरण पावले आहेत किंवा त्यांचा शोध घेता आलेला नसून साक्षीदारांचा आकडा १९५ पर्यंत खाली आला असल्याची माहिती एनआयएच्यावतीने ॲड. संदेश पाटील यांनी खंडपीठाला दिली. त्यात आता आणखी ७० साक्षीदार कमी झाले असून आता केवळ १२५ साक्षीदार सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पाटील यांनी खंडपीठाला दिली तसेच साक्षीदारांच्या आधारे आरोपीविरोधात खटला आम्ही सिद्ध करून दाखवू असा दावाही केला.

आरोपी याचिकाकर्ता कुलकर्णींनी खटला जलदगतीने सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळवेळी दिलेल्या आदेशाची आठवण न्यायालयाला करून दिली. त्याची दखल घेत जलद खटला चालवावा असे वाटत असल्यास तुम्हालाही सहकार्य करावे लागेल. आम्ही साक्षीदार सादर करण्याचा कुणाचाही अधिकार कमी करू शकत नाही. सर्व आरोपींना सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने कुलकर्णींना समज देत याचिका निकाली काढली.