पुण्यात नामांकित हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार! विद्यार्थिनींचे पर्सनल व्हिडिओ व्हायरल

शिवाजीनगर परिसरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थींनींचे पर्सनल व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला आहे.

    पुणे : पुण्यातील नामांकित हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवाजीनगर परिसरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे पर्सनल व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला आहे. हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीनेच इतर विद्यार्थींनीचे पर्सनल व्हिडिओ काढून मित्राला पाठवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    पुण्यातील या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आर्या काळे आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी आर्या ही मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तिने हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींचे लपून व्हिडिओ काढले. तसेच हे व्हिडिओ काढून मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या दोन्ही आरोपींनी मिळून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

    आरोपी व्यक्तींनी विद्यार्थिनींचे कमी कपड्यांमधील पर्नसल फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. या धक्कादायक प्रकारानंतर नामांकित कॉलेजच्या प्रशासनाने आरोपींवर कारवाई केली आहे. तसेच स्पष्टीकरण देत पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे. आरोपी विद्यार्थ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलेले आहे. मात्र या प्रकारामुळे पुण्यामध्ये एकच खळबल उडाली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून अनेक विद्यार्थी हॉस्टेलवर राहत असतात. नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच हा प्रकार घडल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.