Child Sexual Abuse

    पुणे : पुणे शहरातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा वर्षांच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्कार व माराहाणीचा तसेच बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अत्याचार केल्यानंतर आरोपीची मारहाण

    याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून ती दिव्यांग आहे. दि. ३१ मार्च रोजी मुलगी तिच्या घराजवळ असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या डोक्यात बुक्की मारली. यावेळी मुलीच्या भावाने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेला. त्यानंतर आरोपी परत तेथे आला तिला शिवीगाळ करून कोणाला सांगू नको म्हणत तिला बुक्की मारून तो पळून गेला.

    बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल
    लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करणार्‍या एकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर शंडगे (31, रा. फुलारेवस्ती, अहमदनगर) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ३१ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार पिडीत मुलीच्या राहत्या घरी १९ जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला.