murder
Shocking! Son killed mother in Pimpri, son arrested

    पिंपरी : घरगुती भांडणातून मुलाने 60 वर्षीय आईच्या डोक्यात लाकडी वासा घालून खून केला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री मामुर्डी येथे घडली. निळकंठ अश्रुबा शिंदे (41 रा मामुर्डी) असे अटक मुलाचे नाव आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी मोमीन सुलेमान शेख यांनी फिर्याद दिली आहे. कांताबाई आश्रुबा शिंदे (60) असे मयत मह लेचे नाव आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने राहत्या घरी आई कांताबाई यांना कौटुंबिक कारणावरून भांडण्यास सुरुवात केली. याभांडणात त्याने चौकोनी आकाराचा लाकडी वासा आईच्या डोक्यात मारला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून पोलिसांनी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.