धक्कादायक! नदीतील झाडावर लटकवला महिलेचा मृतदेह

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पाच वाजता मानगावात मुळा नदीच्या पात्रात एका झाडावर महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही

    पिंपरी- अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह मुळा नदीतील एका झाडावर लटकवला. ही घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी पाच वाजता मुळशी तालुक्यातील मानगावात उघडकीस आली. या प्रकरणातील मयत महिलेचे शवविच्छेदन घटनास्थळीच केले जाणार आहे.

    रमेश पुखराजजी गेहलोत (वय ४४, रा. डांगे चौक, पुणे. मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेची ओळख पटलेली नाही.

    तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पाच वाजता मानगावात मुळा नदीच्या पात्रात एका झाडावर महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही

    ही घटना मागील सात ते आठ महिन्यापूर्वी घडलेली आहे. बुधवारी दुपारी पाच वाजता उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह मुळा नदी पात्राच्या कडेला असेलेल्या एका झाडावर लटकवला.

    हिंजवडी पोलिसांचे एक पथक बुधवारी सायंकाळ पासून घटनास्थळी आहे. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे मयत महिलेचे शवविच्छेदन घटनास्थळीच केले जाणार आहे. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केले आहे