
पुण्याच्या संस्कृतिला काळीमा फासणारी घटना घडली असून, पतीने पत्नीला नग्न अवस्थेत गाण्यांवर नाचण्यास लावून त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, अश्लील चित्रपट दाखवत त्याप्रमाणे अनैसर्गिक अत्याचार देखील केला आहे.
पुणे : पुण्याच्या संस्कृतिला काळीमा फासणारी घटना घडली असून, पतीने पत्नीला नग्न अवस्थेत गाण्यांवर नाचण्यास लावून त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, अश्लील चित्रपट दाखवत त्याप्रमाणे अनैसर्गिक अत्याचार देखील केला आहे.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३१ वर्षीय पिडीत महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, कौटुंबिक छळ तसेच, मारहाणी केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा २०१५ मध्ये आरोपीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर पती त्यांचा मानसिक व शारिरीक छळ करत होता. त्याने मोबाईलवर अश्लिल चित्रफित दाखवली आणि त्याप्रमाणे अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांना नग्न अवस्थेत गाण्यांवर नाचण्यास भाग पाडले. त्याचे मोबाईलवर शुटींग केले. त्याला तक्रारदारांनी विरोध केला.
सतत हा प्रकर घडत होता. विरोध केल्यानंतर त्याने केलेले शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देत असे. तसेच, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना त्रास देत होता. त्याने स्त्रीधन काढून घेतले व त्यांना घरा बाहेर काढले. त्यामुळे त्या माहेरी निघून आलेल्या होत्या. त्या माहेरी राहत असत.
दरम्यान, तो रात्री अपरात्री त्यांना फोनवर शिवीगाळ करत असे. यासर्व घटनेनंतर तक्रारदार या आईकडे राहण्यास गेलेल्या असताना तो तोणा नसताना नसल्याचे पाहून त्याने अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच, पत्नीची बहिण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची बदनामी केल्याचे म्हंटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.