Shots fired at Korean national's house in Pune
Shots fired at Korean nationals house in Pune

    पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात एका कोरियन व्यक्तीच्या घरावर भल्या सकाळी गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली. गोळी बाल्कनीच्या काचेवर लागली आहे. यात कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबार हा चुकून झाला असण्याची शक्यता आहे.

    अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
    याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 49 वर्षीय कोरियन व्यक्तीमे तक्रार केली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, कोरियन व्यक्तीही  नागरस रोडवरील अरेना सोसायटीत राहतात. दरम्यान, ते चाकण येथील एका नामांकित कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा प्रमुख म्हणून करीत आहेत.
    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
    दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळी झाडण्यात आली. गोळी काचेवर लागल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे ते बाहेर आले. पाहणी केली असता त्यांना गोळी झाडण्यात आल्याचे दिसून आले. लागलीच ही माहिती चतु:श्रुगी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.