“ज्यांना स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही…त्यांनी आमची माप काढवीत का?”,  आमच्यातील लोकं फोडण्याचं पाप…; काय म्हणाले जयंत पाटील फडणवीसांना…?

“आमचा पक्ष राज्यभरात पसरला आहे. आमचा पक्ष साडेतील जिल्ह्यांचा नाही,” असंही जयंत पाटील म्हणाले. जनतेनं आमचं सरकार स्वीकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याचं पाप केलं. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं वाटलं होतं. पण, दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं.

    निपाणी – कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, १३ तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकीचा प्रचाराच सत्ताधारी व विरोधकांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. कर्नाटक निवडणुकीच्या (Karnataka Election) प्रचारादरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतील वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी (7 मे) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deverandra Fadnavis) यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना, “राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. यावर आता जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    आमच्यातील लोकं फोडण्याचं पाप…

    “आमचा पक्ष राज्यभरात पसरला आहे. आमचा पक्ष साडेतील जिल्ह्यांचा नाही,” असंही जयंत पाटील म्हणाले. जनतेनं आमचं सरकार स्वीकारलं असताना, आमच्यातील लोक फोडण्याचं पाप केलं. नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, असं वाटलं होतं. पण, दिल्लीतील लोकांनी दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं. आमचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणत असतील तर मग त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला आहे. ज्यांना स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही. त्यांनी आमची माप काढवीत का? असा टोला जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला आहे.

    कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं” – शरद पवार

    दरम्यान, आता फडणवीसांच्या टिकेवर आता प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील फडणवीसांना टोला लगावला आहे. “मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचं आहे…, या सगळ्यावर तिकडं सविस्तर बोलेन,” असं प्रतिउत्तर शरद पवारांनी फडणवीसांना दिलं आहे.

    त्यांनी आमची काळजी करण्याचं कारण नाही

    फडणवीसांच्या टीकेवर बोलताना, अजित पवार म्हणाले की, “जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर, मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. ठीक आहे. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले.