देशाच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्याला महाराष्ट्र सैनिक म्हणायचे का? टोलची तोडफोड करणाऱ्या मनसेवर मंत्री रवींद्र चव्हाण यांची टीका

सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी, विनाशकारी मानसिकता आहे. कुठला सैनिक देशाच्या, राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करतो? त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणायचे का? असा सवाल मंत्री रवींद्र चव्हाण यांचा केला आहे. 

    मुंबई : बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील १६-१७ वर्षापासून सुरु आहे. तरीसुद्धा याचे काम पूर्ण झाले नाही. याविरोधात सध्या मनसे (MNS) आक्रमक होत आंदोलन करत आहे. दरम्यान, मनसेच्या तोडफोडीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची पत्रातून टीका केली आहे. तसेच या आंदोलनावर काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. (Should we call those who damage the country’s property Maharashtra soldiers? Ravindra Chavan criticizes MNS for vandalizing toll)

    महाराष्ट्र सैनिक म्हणायचे का?

    दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रातून टिका केली आहे. दगड फेकणाऱ्या नव्हे तर दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी, असे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी तरुणाईला केले. तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी, विनाशकारी मानसिकता आहे. कुठला सैनिक देशाच्या, राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करतो? त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणायचे का? असा सवाल मंत्री रवींद्र चव्हाण यांचा केला आहे.

    गणेशोत्सवापूर्वी एक लेन खुली
    दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे, मंत्री रविंद्र चव्हाण यांचे तरुणांना आवाहन केले. ​मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल. असं चव्हाण म्हणाले. डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. तसेच मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु असल्याचं चव्हाणांनी म्हटलेय.