भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवरील कारवाई दाखवा अन् लाख रुपये जिंका, औरंगाबादेत राष्ट्रवादीची बॅनरबाजी

भाजपात गेलेल्यांची कारवाई कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक भागात लावले आहे.

    औरंगाबाद – भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक भागात लावले आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर कारवाई होत नाही, नेत्यांना कारवाईंची भीती दाखवत भाजपमध्ये प्रवेश करायला लावतात आणि पक्षप्रवेश होताच सर्व कारवाईंपासून सुटका होते, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.

    देशात कधी नव्हे ते ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार आले आहे. राज्यातही त्यांचे आणि मि़त्रपक्षाचे सरकार असले तरी भाजपची भूक भागत नाहीये, भाजपकडून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत असून आज देशातील केंद्रीय यंत्रणाचे आणि ईडीचे अध्यक्ष भाजपच्या घरगड्यासारखे वागत आहे. तर ईडीही भाजपची दुसरी शाखा झाली आहे. या गोष्टींला कंटाळून जनता त्रस्त झाली आहे, यामुळे कालपरवा भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चौकशी सुरू असल्याचे दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी ऑफर देत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आरोप केला आहे.