केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामचुकार आधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

अवघ्या ११ दिवसापूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून पद्भभार घेतलेले अतुल पाटील यांनी धडक कारवाई चा बडगा उचलित घनकचरा विभागातील कामचुकार, आधिकारी, सफाई कर्मचारी अशा सुमारे १५ जणावर "कारणे दाखवा नोटीस" बजावल्याने कामचुकार, सतत गैहजर, कामात हालगर्जीपणा करणाऱ्या आधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.   

    कल्याण : कचऱ्याची समस्या, सार्वजनिक रस्त्यावर उघड्यावर पडणारे कचर्याचे ढीग, प्रतिबंधीत प्लँस्टिक विक्रि, वापर यामुळे केडीएमसीच्या “शून्य कचरा मोहिमेला हरताळ फासल्याचे चित्र दिसत असताना अवघ्या ११ दिवसापूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून पद्भभार घेतलेले अतुल पाटील यांनी धडक कारवाई चा बडगा उचलित घनकचरा विभागातील कामचुकार, आधिकारी, सफाई कर्मचारी अशा सुमारे १५ जणावर “कारणे दाखवा नोटीस” बजावल्याने कामचुकार, सतत गैहजर, कामात हालगर्जीपणा करणाऱ्या आधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नुकतीच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदी अतुल पाटील यांची नियुक्ती झाली असुन शनिवारी ११जून रोजी “क” प्रभागातील पारनाका हजेरी शेड तसेच “जे” प्रभाग नेतवली हजेरी शेडवर प्रत्यक्ष भेट देत (घ.क.व्य) विभागातील आधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची झाडाझडती घेतल्याने कामचुकारांची पळता भुई उडाली.

    पारनाका हजेरी शेडवर उपायुक्त अतुल पाटील यांनी सकाळी साडेसहा वाजता धडक दिली असता स्वच्छता निरिक्षक हे दीर्घ कालीन रजेवर असल्याचे समजले. तपासणी केली असता आढाव्या दरम्यान कामकाजात काही त्रुटी आढळून आल्या. काही कामगार सकाळी ६.३०वा. कामावर उपस्थित नव्हते. ते कामावर उशीरा हजर झाले होते. अशा कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित जबाबदार स्वच्छता आधिकारी, स्वच्छता निरिक्षक, मुकादम यांचेवर “कारणे दाखवा नोटीस” बजावण्यात आली.

    तर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेतीवली हजेरी शेडवर उपायुक्तांनी भेट दिली असता काही कामगार कामावर हजेरी लावुन उपस्थित नव्हते अशा कामागारांना जे प्रभागाच्या साहय्यक आयुक्तांना विना वतेन करून “कारणे दाखवा नोटीस” बाजविण्यासाठी आदेश दिले. स्वच्छता निरिक्षक प्रभारी यांनी मुख्यालयात रजेबाबत कळविले नसल्याने कारणे दाखवा नोटीस बाजविण्यात आली. (घ.क.व्य.) उपायुक्त अतुल पाटील यांनी केलेल्या कारवाईत एक स्वच्छता अधिकारी, २ स्वच्छता निरिक्षक २ मुकादम, १० सफाई कर्मचारी सुमारे १५ जणावर कारणे दाखवा नोटीस च्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

    “या पुढे मनपा क्षेत्रातील सर्वच हजेरी शेडवर उपायुक्त अतुल पाटील भेट देऊन कामात हालगर्जीपणा, कामचुकारपणा करणाऱ्या स्वच्छता निरिक्षक, मुकादम, सफाई कामगार ,वाहनचालकावर कडक कारवाई करणार असल्याचे तसेच प्रतिबंधीत प्लँस्टिक वापर, हातळणी व विक्रीवर बंदी आणणे, दंडात्मक कारवाई करणे याबाबत कल्याण विभागात १ पथक, डोंबिवली विभागात १ पथक मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार निर्माण करुन सहाय्यक आयुक्त (अ.बा. नि) यांच्याकडून पोलिस यंत्रणा, फेरीवाला हटाव पथक देण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याचे घ.क.व्य विभागाने कळविले असल्याने आता घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामचुकार आधिकारी, कर्मचारी यांची आता खैर नसल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.