Welcoming the wrong decision of the court; Minister Bachchu Kadu's reaction to the sentence of two months rigorous imprisonment

आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, जर १ नोव्हेंबरपर्यंत पैसे घेतल्याचे पुरावे सादर नाही केले तर, मी वेगळा निर्णय घेईन असा स्पष्ट इशारा बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच राणांच्या वक्तव्याने दुखावलेले सात ते आठ आमदारही आपल्या संपर्कात असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. पन्नास खोके...एकदम ओक आणि मोफत किराणा वाटपावरून वाद बच्चू कडू व रवी राणा यांच्यात सध्या जोरदार कलगीतुरा सुरू आहे.

    अमरावती : अचलपूरचे अपक्ष आमदार व माजी मंत्री बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात पन्नास खोके व मोफत किराणा वाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे, चक्क बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. यावर संतापलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारलाच आव्हान देत अल्टीमेटम दिला आहे. तसेच राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

    दरम्यान, आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, जर १ नोव्हेंबरपर्यंत पैसे घेतल्याचे पुरावे सादर नाही केले तर, मी वेगळा निर्णय घेईन असा स्पष्ट इशारा बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तसेच राणांच्या वक्तव्याने दुखावलेले सात ते आठ आमदारही आपल्या संपर्कात असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. पन्नास खोके…एकदम ओक आणि मोफत किराणा वाटपावरून वाद बच्चू कडू व रवी राणा यांच्यात सध्या जोरदार कलगीतुरा सुरू आहे.

    मागील २० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करीत आहे. पक्षाशिवाय, झेंडय़ाशिवाय आणि पैसे खर्च न करता चार वेळा निवडून आलो.  राणा यांनी केलेल्या आरोपामुळे लोकांच्या मनात एक वेगळा संदेश जात आहे. एका बापाची औलाद असेल तर 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे देईल, अशी जहरी टीका कडू यांनी राणा यांच्यावर केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांचा शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा आहे. तरीही दोघांकडूनही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत असून, दोघांची पातळीही खालावली आहे. त्यामुळं आगामी काळात कडू-राणा यांच्या वादावर शिंदे-फडणवीस काय भूमिका घेताहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.