
तालुक्यातील खडकी सदार येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचा प्रश्न स्वतंत्र काळापासून रखडला आहे. पावसाच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली जात असतो. परिणामी, खडकी सदार गावाचा शहरापासून संपर्क तुटतो, गावातील दळणवळण ठप्प होते.
वाशीम : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत (Life Disrupted) झाले आहे. रिसोड तालुक्यामधील (Risod Taluka) खडकी सदार (Khadki Sadar) येथील नागरिकांना मागील तीन दिवसांपासून शहराचा संपर्क तुटला आहे. गावाशेजारी नाल्याला पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या समस्याचा सामना कराव लागत आहे. वेळोवेळी लोकप्रतिनीधीकडे पुलाची मागणी करुनही अद्याप पूल झाला नसल्याने गावातील तरुणानी लोकप्रतिनीधीच्या नावाने श्राद्धच घातले आहे.
तालुक्यातील खडकी सदार येथे जाणारा मुख्य रस्त्यावरील पुलाचा प्रश्न स्वतंत्र काळापासून रखडला आहे. पावसाच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली जात असतो. परिणामी, खडकी सदार गावाचा शहरापासून संपर्क तुटतो, गावातील दळणवळण ठप्प होते. रुग्णानां हॉस्पिटलमध्ये( Hospital ) जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे खडकीवाशीयांच्या मरण यातना कधी संपतील, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थोड्या प्रमाणात सुद्धा पाऊस सुरु झाला की, नाल्यावर पाणी येत आणि संपूर्ण गावाचे जनजिवनच विस्कळीत होत आहे.
रिसोड तालुक्यातील खडकी सदार हे अठराशे ते दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता नाल्यावरून जातो या नाल्यावर गेले अनेक वर्षापासून पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत खडकी वासियांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. आता गावातील तरुणामध्ये असंतोष वाढत आहे. यामुळे, गावातील तरुणांनी लोकप्रतिनीधीच्या नावाने श्राद्धच घातले आहे.
गावातील पुलाची मागणी वेळोवेळी करुनही आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाही. आम्हाला रोज या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे, आम्ही नारळ फोडून खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या नावाने श्राद्धच घालत आहोत.
शंकर सदार, ग्रामस्थ, खडकी सदार