‘श्रीं’ गजानन महाराजांची पालखी मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात दाखल, विदर्भाच्या हद्दीवर जल्लोषात स्वागत

बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत सिंदखेड राजा येथे 'श्री' च्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आलेय. सर्व परिसर भक्तिमय होवून केला होता.

    बुलढाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री संत गजानन महाराज संस्थान’ शेगांवची दिंडी ला मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडला होता, परंतु यावर्षी ‘श्री’ ची पालखी मोठ्या दिमाखामध्ये शेगांव वरून पंढरपूरकडे प्रस्थान झाली होते. पंढरपूर येथे 8 ते 12 जुलै मुक्काम झाल्यानंतर पंढरपूरहून शेगांवकडे निघालेल्या शेगांवचा राजा श्री संत गजानन महाराजांची पायदळ वारीचे आगमन मराठवाड्याच्या हद्दीतून विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या हद्दीत झाले. यावेळी पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

    मुखी गजाननाचा जयघोष, कपाळी केशरी गधं, खाद्यावर भगवी पताका, हातात टाळ आणि मृदुंगाची चाल,अशा भरलेल्या वातावरणात जल्लोषामध्ये ‘श्री’ च्या पालखीचे स्वागत सिंदखेड राजा नगरीतील अनेक भाविकांनी केलेय.”गण गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन च्या जय घोषात” बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत सिंदखेड राजा येथे ‘श्री’ च्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आलेय. सर्व परिसर भक्तिमय झाला होता. आषाढी एकादशीनंतर गजानन महाराजची पालखी शेगांवकडे प्रस्थान करत आहे.यावर्षी पालखीचे 53 वे वर्ष असून शेगांव ते पंढरपूरपर्यत 725 किलोमीटर आणि पंढरपूर ते शेगांव परतीचा प्रवास हा 550 किलोमीटरचा पायी प्रवास आहे. येत्या 3 ऑगस्टला पालखी शेगांवला पोहचणार आहे.