श्री संत भोजने महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

शेष म्हणजे यावर्षी श्री संत भोजने महाराज पालखीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला आहे. रथ देखील या दिंडीत सहभागी झाला आहे.

    दरवर्षी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूर साठी शेकडो पालख्या विविध ठिकाणाहून जात असतात मात्र गेल्या तीन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालख्या निघाल्या नव्हत्या तर तीन वर्षानंतर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले अटाळी येथील श्री संत भोजने महाराज या दिडींत अटाळीसह पंचक्रोशीतील १५० पुरुष ५०महिला वारकरी विठ्ठलाचा जयघोष करीत पंढरपूरला रवाना झाली आहे.

    खामगाव तालुक्यातील श्री विठ्ठल रुखमाई सदगुरु भोजने महाराज संस्थान श्री क्षेत्र अटाळी ते श्री क्षेत्र पंढरपूर पाय वारी दिंडी आषाढी एकादशी निमित्य मागील १५ वर्षापासून पंढरपूरकडे पायदळ वारी दिंडी रवना झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी श्री संत भोजने महाराज पालखीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला आहे. रथ देखील या दिंडीत सहभागी झाला आहे. ही दिंडी देऊळगाव साकर्शा, जानेफळ, मेहकर, लोणार, तळेगांव, गेवराई, साटोणा, आष्टी, सादोळा, पातृड, कळंब, येरमाळा, जामगाव, खांडवी, भोसारे, या मार्गे पंढरपूर येथे ७ जलै रोजी पोहचणार आहे.