हे माझं घरचं ऑफिस आहे, व्हायरल फोटो चुकीचा आहे – श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले की, हे माझं घरचं ऑफिस आहे, व्हायरल फोटो चुकीचा आहे. मागे जो बोर्ड लावलाय तो मुख्यमंत्री कार्यालयातील नाही, मागे जो बोर्ड लावलाय तो चुकीचा आहे, फोटोमधील घर शासकीय किंवा वर्षामधील नाही. मागील बोर्डची मला कल्पना नव्हती असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याने वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे चालवतात का? असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर (CM Chair) श्रीकांत शिंदे बसल्याचा फोटो व्हायरल करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने जोरदार टिका केली आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Shrikant Shinde Sitting on Cm Chair Viral Photo) यावर आता स्वत: खासदार श्रीकांत शिंदेकडून यावर खुलासा आला असून, हा चुकीचा फोटो असल्याचा दावा श्रीकांत शिंदेंनी केला आहे.

    हे माझं घरचं ऑफिस आहे – श्रीकांत शिंदे

    दरम्यान, श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले की, हे माझं घरचं ऑफिस आहे, व्हायरल फोटो चुकीचा आहे. मागे जो बोर्ड लावलाय तो मुख्यमंत्री कार्यालयातील नाही, मागे जो बोर्ड लावलाय तो चुकीचा आहे, फोटोमधील घर शासकीय किंवा वर्षामधील नाही. मागील बोर्डची मला कल्पना नव्हती असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. तर शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यात हॉलच्या बाजूला श्रीकांत शिंदे यांची मीटिंग रूम आहे. हा तिथला फोटो आहे. मुख्यमंत्री शिंदे देखील या रूममध्ये बसून लोकांना भेटतात. श्रीकांत यांच्या मागे दिसणारा बंद दरवाजा मागच्या दिवाणखान्यात उघडतो. आणि त्याला लागून वर जाण्यासाठी जिना अणि त्याला लागून लिफ्ट आहे. असं सुद्धा शिंदे गटाकडून सांगण्यात येत असून, व्हायरला फोटोचा दावा फेटाळून लावला आहे.