मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याने वातावरण तापले, फोटो शेअर करत काँग्रेस-राष्ट्रवादीची टिका

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे चालवतात का? तसेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर (CM Chair) श्रीकांत शिंदे बसल्याचा फोटो व्हायरल करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आरोप केले आहेत. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या शासकीय कार्यालयातील खुर्चीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याने वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे चालवतात का? तसेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर (CM Chair) श्रीकांत शिंदे बसल्याचा फोटो व्हायरल करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आरोप केले आहेत. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Shrikant Shinde Sitting on Cm Chair Viral Photo)

    दरम्यान, ज्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसले आहेत त्याच्या मागेच महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असलेला फलक आहे.  “खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?” असा प्रश्न रविकांत वरपे यांनी विचारला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दुसऱ्या जबाबदार व्यक्तीने बसणं योग्य नसल्याचाही आरोप श्रीकांत शिंदेंवर केला जातोय. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच श्रीकांत शिंदे या खुर्चीवर बसल्याने विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळं याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा कसे उत्तर देते हे पाहावे लागले.