
२०० हून अधिक अत्यंत घातक अशा ग्रेट व्हाइट शार्क (Great White Shark) माशांचा वावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केप टाऊन (Cape Town) येथील फॉल्स बे ह्या जगातील अतिशय खडतर असलेल्या टफेस्ट १३ मधील ३३ किलोमीटरची सागरी मोहीम ९ तास ४६ मिनिटांमध्ये पोहून फत्ते केली.
कल्याण : तेनझिंग नोर्गे (Tenzing Norge) राष्ट्रीय साहसी क्रीडा पुरस्कार (National Adventure Sports Award) आणि शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati State Adventure Sports Award) विजेता (Winner) डोंबिवली (Dombivali) येथील शुभम वनमाळी (Shubham Vanmali) याने पुन्हा एकदा एक अचाट विक्रम करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
२०० हून अधिक अत्यंत घातक अशा ग्रेट व्हाइट शार्क (Great White Shark) माशांचा वावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केप टाऊन (Cape Town) येथील फॉल्स बे ह्या जगातील अतिशय खडतर असलेल्या टफेस्ट १३ मधील ३३ किलोमीटरची सागरी मोहीम ९ तास ४६ मिनिटांमध्ये पोहून फत्ते केली. शुभम हा फॉल्स बे पोहणारा केप लाँग डिस्टंस स्विमींग असोसिएशनच्या नोंदीनुसार आशियातील पहिला आणि जगातील १० वा जलतरणपटू ठरला आहे. या कामिगिरी बाबत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी त्याचा नुकताच सन्मान केला आहे.
फॉल्स बे हे अतिशय घातक अशा ग्रेट व्हाइट शार्कचे माहेरघर समजले जाते. या समुद्री भागामध्ये २०० हून अधिक या जातीच्या शार्क माशांचा वावर असतो. त्यामुळे येथे जगातील नामवंत जलतरणपटू पोहण्याचा विचार करण्याससुद्धा धजावत नाहीत. त्यामुळे यापुर्वी हे आव्हान जगातील खुप कमी जलतरणपटूंनी स्विकारले आहे आणि त्यामधील खुपच कमी जलतरणपटूंनी यशस्वी केले आहे.
दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकी वेळेनुसार सकाळी ६.२८ वाजता शुभम ने जवळपास १५° सेल्सिअस तापमान असलेल्या थंड अशा पाण्यामधे पोहण्यास सुरूवात केली आणि सायंकाळी ४.१४ वाजता ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यादरम्यान त्याला थंड पाण्याबरोबरच साथ न देणारे वारे, मोठमोठ्या लाटा आणि विरूद्ध दिशेचा पाण्याचा प्रवाह याचबरोबर असंख्य प्रमाणात असलेल्या ब्ल्यू बॉटल या जगातील घातक समजल्या जाणाऱ्या जेली फिश इत्यादी आव्हानांना तोंड द्यावे लागले.
या मोहिमेबद्दल शुभमने बोलतांना सांगितले कि, “माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात रोमांचकारी पोहताना प्रत्येक क्षणाक्षणाला वाटणारी शार्कची भिती. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही मोहीम पार पाडायचीच हा दृढ निश्चय आणि विश्वास यामुळेच मी यशस्वी झालो. ब्ल्यू बॉटल जेली फिश बद्दल मी खूप माहिती वाचली होती परंतु एवढ्या प्रमाणात या समुद्रामध्ये असतील असे वाटले नव्हते. प्रत्येक ५० मीटरनंतर कळपामध्ये असंख्य असे ब्ल्यू बॉटल मला दंश करीत होते. यामधील एक जेलीफिश तर संपूर्ण मानेभोवती गुंडाळला गेला होता. तो कसाबसा निघाला. अंगाची लाही लाही होत होती. परंतु माझा जेलीफिश दंशाचा अनुभव कामी आला. न थांबता पोहणे हाच यावर उपाय होता.”
शुभमच्या या यशस्वी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुभम सध्या पलावा लेकशोअर येथे रूपाली रेपाळे स्विमींग अकॅडमी अंतर्गत जलतरण प्रशिक्षण घेत आहे. हि मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभमबरोबर त्याचे प्रशिक्षक माजी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रूपाली रेपाळे आणि माजी राष्ट्रीय जलतरणपटू अनिरुद्ध महाडिक तसेच त्यांचे वडील धनंजय वनमाळी सुद्धा उपस्थित असल्याची माहिती दीपिका वनमाळी यांनी दिली.