एक-एक मतासाठी काय करावे लागते बघा, आजारी आमदार मुक्ता टिळक व्हिलचेअरवरुन येत केलं मतदान, तर लक्ष्मण जगताप मतदानासाठी पुण्याहून रवाना

आज पुण्यातील आजारी असलेल्या आमदार मुक्ता टिळक ( Pune MLA Mukta Tilak) चक्क व्हिलचेअरवरुन येत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे विधान भवनाच्या आवारात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Devendra fadnvis and Praveen darekar) तसेच भाजपा आमदारांनी मुक्ता टिळक यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रणकंदन माजताना दिसत आहे. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील चार दिवसांपासून मुंबईत हॉटेलमध्ये (MLA Mumbai Hotel) ठेवले आहे. तसेच एक एक मतांसाठी भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग (For one one vote MVA and BJP fielding) लावली आहे. भाजपाने आजारी आमदारांना सुद्धा मतदानासाठी मुंबईत आणले आहे. तर मविआ सुधा मलिक व देशमुख यांच्या मतासाठी झगडत आहे.

    दरम्यान, आज पुण्यातील आजारी असलेल्या आमदार मुक्ता टिळक ( Pune MLA Mukta Tilak) चक्क व्हिलचेअरवरुन येत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे विधान भवनाच्या आवारात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Devendra fadnvis and Praveen darekar) तसेच भाजपा आमदारांनी मुक्ता टिळक यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पुण्याचेच आणखी एक भाजपाचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप MLA Laxman Jagtap) हे सुद्धा मतदानासाठी् पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे मविआ सुद्धा एक एक मतासाठी प्रयत्न करत आहे. मलिक देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) याचिका फेटाळल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांना मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व मविआ प्रयत्नशील आहे. दरम्यान, विधान परिषदेची दुपारी 12 वाजेपर्यंतचे एकूण मतदान 203 आमदारांनी मतदान केले.